Lust For Life

Entries from March 2007

फिरायला जाताना

March 20, 2007 · Leave a Comment

फिरायला जाताना तरंगत जावे चांदण्यावर
आणि जमिनीची पापी घ्यावी तसे अलगद टेकवावे पाऊल…
असे अल्लद चालल तेव्हाचा येईल कळून
गच्च गावतात आधीच दडलेली असते आपली चाहूल…

फिरायला जाताना असे हळूवार उच्चरावेत शब्द
की ऐकू जयला हवेत ते त्याच्या त्याच्याच वाक्याला!
इतक्या तरल शब्दाआड दड़लात तरच दिसेल…
बुटावाचून धावती cyndrella बराच्या ठोक्याला…

फिरायला जाताना नुसतेच फिरत राहू नये
चंद्रचे तुकडे थोडे थोडे गोळा करत राहावे…
गावतात हिरवा, रात्रीत निळा
असे सारे थोडे थोडे रांग पेरत जावे…

फिरायला जाताना सगळे सगळे जावे
आपण जे जे नाही , ते ते सारे होऊन पहावे
देहसाठी शाल-टोपी आणि मनासाठि -
- तान्ह्या बळाच्या जावळसारखे एक स्वप्ना घ्यावे….!

-संदीप खरे

Categories: poetry · मराठी